Kokan: ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी शामराव काळे

0
13
ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी शामराव काळे

वेंगुर्ला प्रतिनिधी- ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ल्याची वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी संघाची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष-शामराव काळे, सचिव-रमेश पिगुळकर, कार्यवाह – मोहन दाभोलकर, उपकार्यवाहरामचंद्र घोगळे यांचा समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सगळ्या-गोष्टी-विकण्याच/

मावळते अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. जोशी यांनी नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा देत ज्येष्ठ नागरिक संघाला २५ वर्षे पूर्ण झाली असून त्याबद्दल एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात, लेख देऊन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आजपर्यंत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल श्री.जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

फोटो – शामराव काळेरमेश पिगुळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here