Kokan: ज्येष्ठ शिक्षक अशोक काकतकर यांचा कृतज्ञता सत्कार संपन्न

0
74
Ashok-Kakatkar-Satkar.
ज्येष्ठ शिक्षक अशोक काकतकर यांचा कृतज्ञता सत्कार संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- ज्येष्ठ शिक्षक अशोक रामचंद्र काकतकर यांचा कृतज्ञता व गौरव समारंभ २६ ऑक्टोबर रोजी पार पडला. पिगुळी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अनंत आठल्ये यांच्या हस्ते श्री.काकतकर यांना रोख २९ हजार ५०० व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-जिल्हा-समन्वयक-स/

अशोक काकतकर यांनी १३ वर्षे रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्य केले होते. त्यानंतर वेंगुर्ला येथे खाजगी शिकवण्याही घेतल्या. त्यामुळे त्यांचा विद्यार्थी वर्गही मोठा आहे. सन २०२० मधील कोरोना संकटात शिकवण्या बंद झाल्या. त्यांना कोणताही पगार नाही किवा पेन्शनही नाही. असे असताना त्यांनी स्वखर्चाने २० डेस्क-बेंच आणि दोन बोर्ड पाटकर हायस्कूलला देणगी दाखल दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला. यावेळी आत्माराम बागलकर, बाबूराव खवणेकर, अनंत आठल्ये, रामचंद्र घोगळे, दिनकर आचार्य, विजय वाडकर आदी उपस्थित होते. तर सौ.काकतकर यांचाही सौ.आठल्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कृतज्ञता व गौरव समारंभासाठी अनंत आठल्ये, पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, प्रसन्ना देसाई, १९९० सालातील विद्यार्थी पाटकर ग्रुपतर्फे शंकर मांजरेकर, अॅड.दिनकर वडर, विजय वाडकर, आत्माराम बागलकर, कुमा गावडे, बाबुराव खवणेकर, रामचंद्र घोगळे, दिनकर आचार्य यांनी आर्थिक सहकार्य केले. 

फोटोओळी – ज्येष्ठ शिक्षक अशोक काकतकर यांचा अनंत आठल्ये यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here