Kokan: झुलता पुल येथे पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी

0
16
झुलता पुल येथे पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी
पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणा-या वेंगुर्ला येथील झुलता फुल परिसरात ट्राफिक नियंत्रणासाठी वेंगुर्ला पोलिसांची नेमणूक करावी अशा आशयाचे निवेदन मुख्यधिकारी यांना शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी दिले.

वेंगुर्ला प्रतिनिधी – पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणा-या वेंगुर्ला येथील झुलता पुल परिसरात ट्राफिक नियंत्रणासाठी वेंगुर्ला पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-केस-आयएच-case-ih-ने-त्यांच्या-प/

  वेंगुर्ला बंदर व नवाबाग या तिराच्या संगमावर झुलत्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. अत्यंत मनमोहक असे हे झुलते पूल सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे अनेक छायाचित्रकार येथे छायाचित्रणासाठी व व्हिडिओ चित्रीकरणासाठी पसंती दर्शवतात. आज संपूर्ण कोकणात हे एकमेव झुलते पुल असल्याने पर्यटकांना आकर्षण करणारे ठरत आहे. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात पर्यटक या पर्यटन स्थळाला येऊन भेट देत आहेत. त्यामुळे हे एक पर्यटन स्थळ म्हणून मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. हे वेंगुर्ला शहराच्या दृष्टीने अधिक गौरवनीय आहे.

      मात्र सायंकाळी ५ ते रात्रौ ९ यावेळेत पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने येथे ट्राफिक विषयाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता पर्यटकांना कोणताही त्रास न होता सदर पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी नगरपरिषदेने पोलीस विभागाच्या मदतीने ट्राफिक नियोजन करावे येथे ट्राफिक होत असलेल्या वेळेत ट्रॅफिक पोलीस गर्दीच्या नियोजनासाठी तैनात करावेत. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रित होईल व पर्यटनाचा आनंदही पर्यटकांना घेता येईल त्याकरिता नगरपरिषद व पोलीस यांनी नियोजन करावे अशी मागणी वेंगुर्ला शिवसेना शहराच्यावतीने शहर प्रमुख उमेश येरम यांनी केली आहे.

      तशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी व पोलीस स्थानक यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्या समवेत महिला शहर अध्यक्षा श्रद्धा बाविस्कर-परबयुवक शहर प्रमुख संतोष परबपवक्ते सुशील चमणकरशाखा प्रमुख प्रभाकर पडतेतुळस विभाग प्रमुख संजय परबजैतिर विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुनील तुळसकरमहेश परब आदी उपस्थित होते.

फोटो ओळी – पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणा-या वेंगुर्ला येथील झुलता फुल परिसरात ट्राफिक नियंत्रणासाठी वेंगुर्ला पोलिसांची नेमणूक करावी अशा आशयाचे निवेदन मुख्यधिकारी यांना शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here