– 🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / ओरोस ता. १५-:
सिंधुदुर्ग जिल्हापरिषदे समोर जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार युवक व युवतीनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. डी.एड. बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष श्री. फाले यांच्याशी चर्चा करून 7 ऑक्टोबर 2024 रोजी परिपत्रकात बदल करण्याच्या मागणी संदर्भात शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंदोलन करणाऱ्या डि.एड. बेरोजगाराना दिले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शाळांना-दिवाळीची-१४-दिव/
तसेच जो पर्यंत 7 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकात आंदोलनकरत्यांच्या मागणी नुसार बदल होत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करू नये अशी विनंती जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. डि.एड बेरोजगार 2010 पासून पदविका घेऊन बेरोजगार राहिल्याने डि.एड पदविका जेष्ठता निकष लावून नियुक्त्या द्याव्यात असे न केल्याने त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येणार आहे. त्याच प्रमाणे शाळा ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे त्याच हद्दीतील उमेदवार असा जो परिपत्रकात उल्लेख आहे त्यात बदल करून तालुका हद्दीतील उमेदवार असा करावा अशी डि.एड बेरोजगार आंदोलन कर्त्यांची मागणी आहे. या मागण्या मान्य होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे जे काही करणे शक्य आहे ते आम्ही करू असे आश्वासन यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिले.