Kokan: तहसील कार्यालयात जाते असे सांगून घरातून निघून गेलेली विवाहीता गडनदी पात्रात मृत्ताअवस्थेत आढळली

0
35
विवाहीता गडनदी पात्रात मृत्ताअवस्थेत आढळली
तहसील कार्यालयात जाते असे सांगून घरातून निघून गेलेली विवाहीता गडनदी पात्रात तरंगताना मृत्ताअवस्थेत आढळली

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

कणकवली ता. १२ : कणकवली गडनदीपात्रात आज विवाहितेचा मृतदेह आढळून आला. स्वरानी सचिन नेरकर (वय ३३, रा.तेली आळी) असे तिचे नाव आहे. तीचे पती सचिन नेरकर हे कणकवली नगरपंचायतीमध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी स्वरानी ही सकाळी ११ च्या सुमारास तहसील कार्यालयात जाते असे सांगून घरातून गेली. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुमामे-येथील-राजेंद्र-जय/

सायंकाळी साडे चारच्या सुमारास सचिन यांना भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा फोन आला. त्यामध्ये तुमची पत्नी गडनदी बंधाऱ्यात तरंगताना आढळली असून तिला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार सचिन नेरकर हे उपजिल्हा रूग्णालयात गेले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी स्वरानी नेरकर हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान वागदे सरपंच संदीप सावंत यांना दुपारी तीनच्या सुमारास गोपुरी आश्रम लगतच्या गडनदी बंधाऱ्यामध्ये एक विवाहिता वाहून येत असल्याचे दिसून आले होते. त्यांनी याबाबत कणकवली पोलिसांना कळविले. त्यानंतर नदीपात्रातील झुडूपांना अडकलेला विवाहितेचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. नंतर हा मृतदेह स्वरानी नेरकर हिचा असल्याचे निष्पन्न झाले. स्वरानी आणि सचिन नेरकर यांचा विवाह जुलै २०२१ मध्ये झाला होता. दरम्यान स्वरानी हिच्या मृत्यू प्रकरणी कणकवली पोलिसांत आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here