Kokan: तुळस येथील भजन स्पर्धेत वालावलचे लक्ष्मीनारायण मंडळ प्रथम

0
38
भजन
साळीस्ते येथे १२ रोजी ढोल-ताशा वादन स्पर्धा

🔥दैनिक सिंदुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-

तुळस भजनप्रेमीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेत वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळाने पहिला क्रमांक पटकाविला.

  तुळस भजनप्रेमी तर्फे १८ व १९ जानेवारी रोजी तुळस रामेश्वर मंदिरात जिल्हास्तरीय निमंत्रितांची संगीत भजन स्पर्धा संपन्न झाली. उद्घाटन सरपंच रश्मी परब, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेत प्रथम-लक्ष्मीनारायण भजन मंडळ-वालावल, द्वितीय-दत्त प्रासादिक भजन मंडळ-वर्दे, तृतीय-स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ-शेर्ले, उत्तेजनार्थ-माऊली भजन सेवा संघ-इन्सुली व महापुरूष प्रासादिक भजन मंडळ-भोगवे यांनी पटकाविले.https://sindhudurgsamachar.in/kokan-आजगाव-येथे-डंपर-पलटी-होऊन/

  उत्कृष्ट गायक-सुरज लोहार (लक्ष्मीनाराण वालावल), उत्कृष्ट हार्मोनियम-दुर्गे मिठबांवकर (सिद्धिविनायक भजन मंडळ,जानवली), उत्कृष्ट पखवाज - प्रथमेश राणे (लक्ष्मीनारायण वालावल), उत्कृष्ट तबला-राजाराम परूळेकर (महापुरूष भोगवे), उत्कृष्ट कोरस-लक्ष्मीनारायण-वालावल, उत्कृष्ट झांज-ललित कोळंबकर (महापुरूष भोगवे), शिस्तबद्ध संघ - स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ-शेर्ले, उत्कृष्ट गजर - लक्ष्मीनारायण-वालावल यांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण स्वप्निल गोरे आणि मोहन मेस्त्री यांनी केले.

  स्पर्धेसाठीची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उबाठा वजराट विभागप्रमुख संदिप पेडणेकर, अजित पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन लिगोजी, साई भोई, महेश नाईक, विठ्ठल माळकर, संदिप नाईक (मुंबई), पुरूषोत्तम परब, हर्षिनी सावळ, विवेक तुळसकर, तेजस गडेकर, राजेश परूळकर, वेदांग पांगम यांनी पुरस्कृत केली होती.

  स्पर्धेचे बक्षिस वितरण अजित पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर, माजी ग्रा.पं.सदस्य रामचंद्र परब, ग्रा.पं.सदस्य रूपेश कोचरेकर, देवस्थानचे मानकरी रमेश परब, बाबा परब, पखवाज विशारद मनिष तांबोसकर, वैभव परब, बाबू मेस्त्री, माजी सरपंच विजय रेडकर, खटारवाडी पोलीस पाटील सागर सावंत, नितीन लिंगोजी यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here