वेंगुर्ला प्रतिनिधी- वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग-तुळसच्यावतीने कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्म अशा अश्वमेध तुळस महोत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत ७ जानेवारी रोजी वेताळ मंदिर तुळस येथे सायंकाळी ६.३० वाजता शाळांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.
यात जिल्हास्तरीय माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धांमध्ये समुहगीत गायन, समुहनृत्य, जोडीनृत्य, लावणी नृत्य, प्रश्नमंजुषा, दशावतार साभिनय तर जिल्हास्तरीय प्राथमिक शाळांसाठी (पहिली ते चौथी) समुहनृत्य स्पर्धेचा समावेश आहे. माध्यमिक गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र तर सर्वच स्पर्धा प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणा-या विद्यालयास ‘वेताळ करंडक २०२३‘ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तसेच प्राथमिक गटातील प्रथम तीन क्रमांकांना १०००, ७००, ५०० आणि उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
नावनोंदणी ३ जानेवारी २०२३ पर्यंत प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) व गुरुदास तिरोडकर(९४२०७४७२६८) यांच्याकडे करावी.


