वेंगुर्ला प्रतिनिधी- वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग-तुळस, व विविध सहयोगी सस्थेच्या गुरुकुल शिक्षण संस्था न्हावेली यांच्या सहकार्याने रक्तदानासारख्या क्षेत्रात योगदान देत २५ वे महारक्तदान शिबिर ८ जून रोजी उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी ९ वाजता आयोजित केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-मैत्रीच्या-स्नेहमेळाव/
वेताळ प्रतिष्ठानच्या आत्तापर्यंत आयोजित रक्तदान शिबिरात ज्या ज्या रक्तदात्यांनी नियमित रक्तदान करून अमुल्य योगदान दिले अशा सर्व रक्तदात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या महरक्तदान शिबिरास आणि सन्मान सोहळ्यास रक्तदात्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांनी केले आहे.