देवगड: तोरसोळेफाटा देवगड निपाणीरोडवर ट्रक-कारच्या भिषण अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक करण्यात आली. देवगड निपाणी रोड तोरसोळे फाटा नजिक ट्रक आणि कारचा भिषण अपघातात दोन व्याक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघातात महेश मोहन तोरस्कर (वय वर्ष ४८) तर मनिषा मोहन तोरस्कर (वय वर्ष ७८) तळेबाजार बाजारपेठ यांचा जागीच मृत्यू झाला होता. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-केरळमध्ये-निपा/
या दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रक चालक आरोपी सोमराया होंबलकल वय 31, रा. म्हाळकळ, तालुका सुरपूर जिल्हा यादगिर सध्या राहणार कुबडी, बागेवाडी तालुका विजापूर राज्य कर्नाटक यास देवगड पोलिसांनी अटक करून माननीय देवगड न्यायालयात हजर केले. न्यायालयीन सुनावणीमध्ये ट्रक चालक आरोपी सोमराया होंबलकल यास न्यायालयाने 26 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीची रवानगी सावंतवाडी जिल्हा कारागृह येथे करण्यात आलेली आहे.