Kokan: थांबायचे की नाही हे ज्यांनी त्यांनी समजून घ्यावे – भोसलेंचा केसरकरांना सल्ला

0
72

त्यावेळी अजित पवारांनी माझ्यावर प्रेशर आणला होता. पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट.
सुनिता भाईप / (सावंतवाडी)

सावंतवाडी: ‘आता बस झाले पुरे करा ‘असे फलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे थांबायचे की नाही हे आता ज्यांनी त्यांनी समजून जावे. त्या बद्दल मी काय बोलणार ? असा सल्ला माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी मंत्री दिपक केसरकरांचे नाव न घेता दिला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-कोपरी-मराठा-समाज-वतीने-श/

दरम्यान कोणी कीतीही दावा केला तरी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच लढणार आहे आणि त्यासाठी अर्चना घारेंचे नाव अंतिम आहे. मागच्या निवडणूकीत त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी माझ्यावर अजित पवारांनी प्रेशर आणला होता. मात्र आता पुढे असे काय होणार नाही असा गौप्यस्फोट श्री. भोसले यांनी केला.

प्रविण भोसले हे आज या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेच्या दरम्यान पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वेगुर्ला तालुक्यात ‘भाई आता बस्स झाले पुरे करा’ असे फलक मंत्री केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आले आहेत. याबाबत भोसले यांना विचारले असता ते म्हणाले,’ आता याबाबत मी काय बोलणार? लोकच बोलू लागले आहेत. त्यामुळे ज्याने त्याने समजावे आणि योग्य तो निर्णय घ्यावा.’

यावेळी कॉंग्रेसकडुन सावंतवाडी मतदार संघावर दावा केला गेला आहे. याबाबत भोसले यांना विचारले असता हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच येणार आहे आणि घारेंनाच संधी मिळणार आहे. मागच्यावेळी तशा प्रकारचा शब्द खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे आता बदल होणार नाहीत. मागच्या निवडणूकीत घारे यांना तिकीट मागे घेण्यासाठी माझ्यावर अजित पवार यांनी प्रेशर आणला होता. मात्र आता काही झाले तरी तसे होणार नाही असा ही गौप्यस्फोट भोसले यांनी केला. तर आपणच लढणार असा जो तो पक्ष भूमिका स्पष्ट करीत असतो मात्र तसे काही होत नाही. आम्ही मात्र लढणार आहोत असे अर्चना घारे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here