मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झालं आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वा-वि-दा-सावरकर-कोठडी-न/
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सोमय्या आणि अनिल परब यांचा या मुद्द्यावरुन कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा उबाठा नेते अनिल परब यांच्यासाठी मोठा धक्का आहे.