Kokan: दापोली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा संपन्न

0
18
क्रीडास्पर्धा संपन्न
दापोली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा संपन्न

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली-

रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत आणि पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग आयोजीत रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या दापोली तालुकास्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानात पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या क्रीडास्पर्धांचे उद्घाटन दापोली पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे व दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचे हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-म्हापण-येथे-कै-माजी-आमदार/

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण, क्रीडाज्योत प्रज्वलन करण्यात आले. याशिवाय या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील गव्हे व तेरेवायंगणी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक शारीरीक कसरती, लेझीमसह कवायत संचलन सादर केले. उद्घाटन समारंभासाठी दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे, बळीराम राठोड, दापोली तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. क्रीडास्पर्धेत कबड्डी, खो-खो, लंगडी, क्रिकेट यांसारख्या सांघिक क्रीडाप्रकारांच्या तर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची आता रत्नागिरी जिल्हा स्तरावर होणाऱ्या क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. या क्रीडास्पर्धेतील सर्व विजयी खेळाडू व संघांना समारंभपूर्वक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here