वेंगुर्ला प्रतिनिधी- दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये तंत्रशिक्षण विभागातर्फे व कॉज टू कनेक्ट फाऊंडेशनच्यावतीने ‘हाताला काम, श्रमाला दाम‘ अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात येत आहेत. यातून होणा-या नफ्यातून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी खास दिपावलीचे औचित्य साधून कै. वामन सदाशिव प्रभूखानोलकर स्मृतीप्रित्यर्थ खानोलकर परिवार दाभोली यांच्याकडून मुलांना बचतपेटीचे वाटप करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-धान्याच्या-पोत्यात-चायन/
यावेळी सुहास प्रभूखानोलकर, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक सतिश वाळवे, तुकाराम सामंत, केतन प्रभूखानोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम प्रभूखानोलकर, मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, वसंत पवार, दिपक पाटील, रेश्मा चोडणकर आदी उपस्थित होते. लवकरच बचत पेटीमध्ये साठवलेल्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक खाते बँकेत काढले जाईल. तसेच बँक कामकाजाबाबत प्रत्यक्ष क्षेत्र भेटही घेण्यात येणार आहे.
फोटोओळी – दाभोली स्कूलच्या विद्यार्थ्यांना बचत पेटीचे वितरण करण्यात आले.