Kokan: दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; आंबोली पोलीसांची कारवाई

0
45
दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली पोलीसांची कारवाई
दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली पोलीसांची कारवाई

सावंतवाडी : प्रतिनिधी

सातुळी येथे पोलीसांना चकवा देत पलायन करणार्‍या आंध्रप्रदेश मधील युवकांना आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारुसह ताब्यात घेण्यात आले. दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (टीएस ०८ एचएन २६७७) सह एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ससीकिरण पल्लाईबाबू अप्पना (२५) व मोहनकृष्णसाय नागसुरेश मुनगा (२२, दोघेही रा. आंध्रप्रदेश) यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली होती . https://sindhudurgsamachar.in/kokan-कोल्हापूर-सिंधुदुर्ग-मा/

याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातुळी तिठा येथे गोव्यातून येणाऱ्या कारला थांबण्याचा इशारा पोलीसांनी केला. मात्र चालकाने कार न थांबविता वेगाने कार चालवून पलायन केले. पोलीस हेड काँस्टेबल बांदेकर यांनी आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार आंबोली चेकपोस्टवर सदर कार तपासणीसाठी थांबविण्यात आली.
कारची तपासणी केली असता कारमध्ये बेकायदा गोवा बनावटीची दारु आढळून आली. ७५० मिलीच्या ३६० बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही संशयितांवर अटकेची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस हेड काँस्टेबल डी. जी. देसाई, मनेश शिंदे, कांबळे व नाईक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here