वेंगुर्ला प्रतिनिधी– जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान तर खानोली ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले दिव्यांग बांधव सुनिल घाग यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-रामदास-परब-यांचे-निधन/
यावेळी दिव्यांग आघाडीचे अनिल शिगाडे, दिव्यांग विकास आघाडीच्या दिक्षा तेली (देवगड), प्रकाश सावंत (कणकवली), दिपक करंगुटकर (पालकरवाडी), समिधा घाग (खानोली), शैलेश गावडे (आसोली), किर्ती वालावलकर (खानोली), चंद्रशेखर खानोलकर (वेंगुर्ल), जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विकलांगांना रोजगार, सामाजिक न्यायाच्या समान संधी देणा-या महत्वकांशी योजनेची अंमलबजावणी स्वयंसहाय्यता गटांच्या सहकार्याने करण्यात येते. या सर्व योजनांचा फायदा दिव्यांगांनी घेऊन आपले जीवन सुकर करावेत असे आवाहन अनिल शिंगाडे यांनी केले.