वेगुर्ला- दिशा चौकेकर प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास विरोध दर्शविताना वेगुर्ला पोलीस
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथे राहणाऱ्या व वेंगुर्ला पंचयत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाला आहे, असा आरोप तिचा भाऊ सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केला आहे. आणि वेंगुर्ले पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग- दंड प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 154 मध्ये एफआयआर (FIR) नमूद केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या घटनेची / गुन्ह्यांची तोंडी माहिती देते, तेव्हा पोलिस ती लिहून घेतात. तक्रारदार किवा माहिती देणाऱ्याला नागरिक म्हणून, आपण दिलेली मौखिक माहिती, पोलिसांना लिहून घेतल्यानंतर, पुन्हा वाचून दाखवण्याचा अधिकार आहे. आपण दिलेली माहिती पोलिसांनी लिहून काढल्यानंतर आपल्याला स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
जर गुन्हा दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिसांनी ताबडतोब एफआयआर नोंदवावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एफआयआर (उदा-ललिता कुमार विरुद्ध यूपी सरकार ) नोंदवल्यानंतर पोलिस त्यांचा तपास/चौकशी करू शकतात. व्यवहारात, जर हा अतिशय गंभीर दखलपात्र गुन्हा (जसे की बलात्कार, खून, अपहरण इ।) असेल तर पोलीस लगेच एफआयआर नोंदवतात. किंचित कमी गंभीर गुन्ह्यांसाठी, पोलिस सामान्यतः प्राथमिक तपास करतात आणि नंतर 2-3 दिवसांत एफआयआर नोंदवतात.
⭐गळफास लावलेल्या स्थितीमधील प्रेत मिळाल्यास खून की आत्महत्या हे कसे ठरवतात? –
जर प्रेत गळफास लावलेल्या स्थितीत असेल तर त्याला हँगिंग असे म्हणतात. ह्या केस मध्ये पोस्ट मॉर्टेम आवश्यक असते. १. मृत्यू गळफासानेच झाला आहे की नाही ते ठरवणे. २. आत्महत्या, खून की अपघात ते ठरवणे.
हँगिंग हे violent asphyxial death ह्या प्रकारात मोडते. साधारणपणे आत्महत्या करणारेच गळफास लावून घेतात कारण एक धडधाकट माणूस दुसऱ्या धडधाकट माणसाला फासावर चढवू शकत नाही. हँगिंग नेच माणूस मृत्यू पावला असेल तर त्याचा चेहरा काळानिळा होतो, डोळे खोबणीच्या बाहेर येतात, जीभ बाहेर येते, तीही काळीनिळी असते. मृत्यूनंतर प्रेत त्याच स्थितीत राहिल्यास सगळे रक्त पायात जमा होते व ती त्वचा लालकाळी होते. गळफासाची जखम फास लावून घेतला असल्यास ही जखम V आकाराची असते. डोके पुढे झुकल्यामुळे मागच्या बाजूला जखम नसते. ह्याउलट दुसऱ्या व्यक्तीने कापड किंवा दोरीने गळा आवळला असल्यास मानेवरची जखम पूर्ण असते. जखमेचे डिसेक्शन केल्यास आतमध्ये रक्तवाहिन्या, स्नायू ह्यांच्यात रक्तस्त्राव आणि जखमा असतात.
हँगिंग मध्ये कारटीलेज किंवा हाड फ्रॅक्चर होत नाही मात्र दुसऱ्याने गळा आवळल्यास स्वरयंत्राला फ्रॅक्चर असू शकते. कधीकधी प्रेताजवळ त्या व्यक्तीची चिठ्ठी मिळते. तीही खरच त्याने लिहिली आहे की नाही किंवा त्याची मनस्थिती त्यावेळी आत्महत्या करण्याची होती की नाही हे सुद्धा ठरवता येते.
⭐पोस्ट मॉर्टेम हँगिंग म्हणजे आधी खून करून प्रेताला गळफास लावणे –
ह्यात गुदमरण्याची लक्षणे दिसत नाहीत. मानेवरची जखम फक्त त्वचेपुरती असते. ज्या कारणाने मृत्यू आला ते कारण सापडते. क्वचित एखाद्याला बेशुद्ध करून फासावर चढवलेले असू शकते. ह्यासाठी जठर, आतडे यांचे तुकडे, लिव्हर, स्प्लिन, ब्रेन इ अवयवांचे तुकडे आणि रक्त विष दिले आहे का ह्याची तपासणी करण्यासाठी पाठवावे लागतात.
जिथे प्रेत सापडते त्याला सीन ऑफ क्राईम म्हणतात. जर खून असेल तर दुसरी व्यक्ती तिथे हजर असली पाहिजे. अश्या वेळी दोन्हीमध्ये मटेरियल ट्रान्सफर होते. ह्याला लोकार्ड्स प्रिन्सिपल असे म्हणतात. म्हणजे खून करणाऱ्या व्यक्तीचे बोटांचे, पायाचे ठसे, केस, कपड्याचे धागे अश्या अनेक गोष्टी सापडू शकतात.
मुख्य म्हणजे ह्या सर्व शंका पोलिसांनी घ्यायच्या असतात.
🔴सकृतदर्शनी धडधडीत पुरावे दिसत असतानाही वेंगुर्ला पोलीस अधिकारी एफआयआर का नोंदवत नाही आहेत? –
⭐कुठल्या मेडिकल रिपोर्टची वाट बघत आहेत..? – ⭐दखलपात्र गुन्हा घडलेला असताना दिशा चौकेकर हिच्या नातेवाईकांनी प्रथम दर्शनी तक्रार दिलेली असताना एफआयआर ची प्रत नातेवाईकांना का अद्यापही दिली जात नाहीय? – ⭐एकंदरीत जागेवरील वस्तुस्थिती पाहताना वेंगुर्ला पोलिस हातमोजे न घालता मयत महिलेच्या अंगावरील दागदागिने हाताळताना दिसत आहेत. हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे की जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. – ⭐मयत दिशा हिचा मृतदेह लटकलेल्या परिस्थितीत का नव्हता?
⭐तो पोलिसांना न कळवता खाली का काढण्यात आला? वेंगुर्ला पोलिसांची गुन्हा घडलेली जागा हाताळतानाची पद्धत, दागिने पॉलिथिन बॅगमध्ये न ठेवता हातात इकडून तिकडे देणे हे सर्व असे संशयास्पद वातावरण नातेवाईकांमध्ये निर्माण झालेले आहे.
वेंगुर्ला पोलीस एफआयआर नोंदवत नसतील तर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे एफआयआर ऑनलाईन तसेच लिखित नोंदवणे आवश्यक आहे. तसेच RTI खाली सदर गुन्ह्याचा होत असलेला तपास दररोज मागवण्यास दिशा चौकेकर हिच्या नातेवाईकास भाग पडेल. – ⭐वेंगुर्ला पोलिसांनी एफआयआर नोंदवणे हे त्यांचे काम आहे गुन्हा घडला आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. –
⭐वेंगुर्ला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे काम चोख बजावण्याची गरज असताना डोळसपणे त्याकडे दुर्लक्ष करून वेंगुर्ला पोलीस कोणाच्या दबावाने कुणाला मदत करत आहेत ?
काय आहे दिशा चौकेकर प्रकरण –
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथे राहणाऱ्या व वेंगुर्ला पंचयत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाला आहे, असा आरोप तिचा भाऊ सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केला आहे. आणि वेंगुर्ले पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
शनिवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या गच्चीवर पिवळ्या नायलॉनच्या दोरीने सौ दिक्षा चौकेकर यांनी गळफास घेतला अशी माहिती पुढे आली. ही माहिती मिळताच सावंतवाडी येथे राहणारे तीचे भाऊ व पेडणेकर कुटुंबियांनी वेंगुर्ले येथे धाव घेतली.
वस्तुस्थिती बघितल्यावर आम्हा कोणालाच तीने आत्महत्या केली यावर विश्वास बसला नाही. तीच्या डोक्याला भली मोठी जखम होती, फरशीवर पडलले रक्त गायब झाले होते, रक्त पुसलेले कपडेही गायब होते, व ज्या ठिकाणी तीने गळफास घेतला ती उंचीही खूप होती, मग तीचा हात दोरी अडकवयाला कसा पोहचला, व आत्महत्या केली तर डोक्याला जबरी घाव कसा या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास होणे गरजेचे आहे. अशी मागणी माजी नगरसेवक पेडणेकर यांनी केली आहे.