Kokan: दिशा चौकेकर हत्या प्रकरण -“हत्या” उघडकीस येऊ नये यासाठी पत्रकारांना मिळाले 2 लाख रुपयांचे पँकेज ?

0
69
दिशा चौकेकर हत्या प्रकरण -,
दिशा चौकेकर हत्या प्रकरण -"हत्या" उघडकीस येऊ नये यासाठी पत्रकारांना मिळाले 2 लाख रुपयांचे पँकेज ?

दिशा चौकेकर हिची हत्या दडपण्यासाठी केलेल्या प्रकाराचे मोबाईल शुटींग अखेर चिरफाडच्या हाती लागल्याने बड्या राजकीय नेत्यांचे चेहरे उघड होणार असल्याचे चिरफाड या मराठी सोषल मिडीयाने या बातमीत नमूद केले आहे ?- गुप्तयंत्रणेकडून माहिती आली उजेडात ? https://sindhudurgsamachar.in/kokan-दिशा-चौकेकर-प्रकरणात-एफआ/ ⭐दिवसाढवळ्या वजनदार वस्तूने डोकीवर खोल जखम करुन हत्या करुन ही हत्या उघडकीस येऊ नये यासाठी पोलीस पत्रकार व राजकीय पदाधिकारी यांना एकूण 10 लाख रुपयांचे पँकेज दिल्याचा प्रकार चिरफाडच्या गुप्त यंत्रणेने शोधून काढला आहे असेही यात म्हटले आहे ..? ⭐शासकीय महिला अधिकाऱ्याचा दिवसाढवळ्या उघडपणे खून होऊनही एकही पत्रकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी घटनास्थळी का पोहचू शकला नाही याचे कोडे या प्रकारामुळे आले उघडकीस ? – – ⭐मंत्रीपदावर असणारे जबाबदार लोकप्रतिनिधी हत्या घडली त्यादिवशी वेगुर्ल्यात पोलीस स्टेशनकडे येऊनही त्यांनी शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणी साधी चौकशी देखील करण्याची तसदी का घेतली नाही ते गुलदस्त्यातील कारण आले यामुळे उघडकीस येणार असल्याचे यात नमूद केले आहे ? ⭐वेंगुर्ला येथे १० फेब्रुवारी दिवशी बाजूला क्रीकेट स्पर्धा स्पीकर लाऊन सुरु असताना हत्या होऊनही कुणालाच काहीच न समजल्याप्रमाणे परिसर शांत पाहिल्यावरच पेडणेकर कुटूंबियांना संशय आला होता ? ⭐खूनासारखा गंभीर प्रकार वेगुर्ला उभादांडा वाघेश्वरवाडी येथे भर दिवसाढवळ्या होतो. येथे एक माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित असताना एकही पत्रकार घटनास्थळी का पोहचू शकत नाही यामुळे वेगुर्लावासीयांनीच आता सत्य काय ते समजून जावे? ⭐दिशा चौकेकर हत्या प्रकरणात हत्या दडपण्यात हात असलेल्या वेगुर्ल्यातील भाजपचे एक माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष यांची लवकरच नावे चिरफाडमधून जाहीर करणार असल्याने बहूतेकांचे धाबे दणादणले असल्याचे समजते..? ⭐खून, हत्या, दडपण्यासाठीच ही मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत का ? वेगुर्लावासीयांसमोर लवकरच सत्य समोर येणार असल्यांने…वेंगुर्ला वासियांचे पुढील घडामोडी कडे लक्ष….? ⭐वेंगुर्ला व सावंतवाडी येथील ज्या ज्या पत्रकारांनी आपले हात ओले करुन शासकीय महिला अधिकारी दिशा चौकेकर हत्या प्रकरणी बातम्या दडपण्यासाठी केलेल्या प्रकरणाबाबत पुरावे देऊन कोल्हापूर रत्नागिरी मुंबईतील संपादकांना नोटीसा बजावणार..असल्याचे चिरफाड चे वृत्त आहे ..? ⭐त्या मँनेज पत्रकारांना आतापर्यंत सर्वच पचल्याने त्यानी आतापर्यंत मँनेज पत्रकारीता केली आहे. आता यांच्या संपादकानाच पुरावेच सादर करुन दिशा चौकेकर हत्या प्रकरणी नोटीसा बजावणी करुन न्यायालयातच ओढणार असल्याचे चिरफाड च्या माध्यमाने प्रकाशित बातमीत म्हटले आहे..?

वेगुर्ला- दिशा चौकेकरची धारधार हत्याराने हत्या करुन तीचे सांडलेले रक्त गायब करुन हत्या आत्महत्या ठरविण्यासाठी चौकेकर कुंटुबियांच्या मदतीला आलेल्या वेगुर्ल्यातील एका भाजपच्या माजी नगरसेवकासह माजी नगराध्यक्षांचा चेहरा लवकरच वेगुर्लावासीयांसमोर मुंबईतील इलेक्टाँनिक मिडीयासमोर पत्रकारपरिषद घेऊन उघड करणार आहे असे सुनिल पेडणेकर यांनी सांगितले आहे . लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच या दोन राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींचे चेहरे वेगुर्लावासीयांना खऱ्या अर्थाने दिसणार आहेत.हत्या दडपण्यासाठी केलेल्या प्रकाराचे मोबाईल शुटींग चिरफाडच्या गुप्त यंत्रणेने मिळविल्याने कोण किती पाण्यात आहेत घटनास्थळावर कोण कोण आधी येऊन कसे गायब झालेत ते या मोबाईल शुटींगमध्ये आलेले असल्याने सत्य काय आहे हे,आता लवकरच उघड होईल. मयताचे कपडे बदलण्यापासून रक्त पूसून गायब करण्यापासून मयताच्या बाॅडीसोबत झालेले सर्व प्रकार एका व्यक्तीने मोबाईवरुन गुप्तपणे शुटींग करुन प्रामाणिकपणे चिरफाड टीमकडे आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पोहचविल्याने आता सत्य लपविणारांचे पितळ उघडे पडणार आहेत हे नक्की ! https://sindhudurgsamachar.in/kokan-व्हिडीओ-गेमच्या-नावाखाल/

त्यामुळे दिशा चौकेकर आत्महत्या कि जाणून बूजून रचलेला हत्येचा कट याला वेगळ वळण मिळणार हे निश्चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here