Kokan: देऊळवाडा वी.का.स.सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्ष पदी श्री महेश बागवे यांची निवड

0
21
देऊळवाडा वी.का. स.सेवा सोसायटी मसुरे
देऊळवाडा वी.का. स.सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्ष पदी श्री महेश बागवे यांची निवड

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ मसुरे /प्रतिनिधी

देऊळवाडा वी.का. स.सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्ष पदी मसुरे सुपुत्र उदोजक, माजी पंचायत समिती सदस्य श्री महेश बागवे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे सभासद अजय प्रभूगावकर, नंदकुमार मुळीक,सचिव शिवानी मसदेकर, सदस्य जगदीश चव्हाण, वासू पाटील, स्वप्नील ठाकूर, हबीब शेख, अनिता पाटीलआणि सदस्य उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री हिर्लेकर साहेब यांनी काम पाहिले. संस्थेचे सभासद अजय प्रभू गावकर यांच्या हस्ते महेश बागवे यांचा हृदय सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासद सर्व ग्रामस्थ शेतकरी हितचिंतक यांच्या सहकार्याने आपण प्रयत्न करणार असून सोबत घेऊन देऊळवाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मसुरेचा कारभार केला जाईल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर बोलताना महेश बागवे यांनी केले. महेश बागवे यांच्या निवडी बद्दल माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी महेश बागवे यांचा हृदय सत्कार केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-तालुका-शिवसेना-उद्/

यावेळी पुरुषोत्तम शिंगरे, सुरेश बागवे, श्री प्रकाश मोरे,दीपक बिलये, संतोष अपराज,आशिष खोत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महेश बागवे यांच्या निवडीबद्दल उदोजक डॉ. दीपक परब, माजी जि प अध्यक्षा सरोज परब, शिवाजी परब, जितेंद्र परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, पंढरी मसूरकर,विलास मेस्त्री यांनी अभिनंदन केले आहे. तसेच मसुरे देऊळवाडा भागामध्ये सुद्धा अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here