Kokan: देवरूख पोलीसांनी आंबा घाटातील गणपती मंदिरातील मुर्ती सुरक्षितस्थळी हलवली

0
66

संगमेश्वर (प्रतिनिधी) : आंबा घाटातील गायमुखाजवळ असणाऱ्या गणपती मंदिरावर डोंगरावरील दगड पडल्याने मंदिराचे नुकसान झाले होते. यानंतर देवरूख पोलीसांनी साखरपा येथील ग्रामस्थांच्या मदतीने मंदिरातील गणपतीची मुर्ती साखरपा ग्रामपंचायत कार्यालयात आणून सुरक्षीतरित्या ठेवली आहे, अशी माहिती देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पालकमंत्री-रविंद्र-चव्ह/

हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारपासून सगळीकडेच पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. शनिवारीही सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरावर पाठीमागे असणाऱ्या डोंगरकड्यातील दगड कोसळला. यामध्ये मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. मंदिराचा एक भाग व पाठीमागील बाजू पुर्णता ढासळून गेली आहे. छोटे दगड व माती गणपतीच्या मुर्तीवर येऊन पडली होती. त्यातच पाऊस बरसत असल्याने गणपतीची मुर्ती सुरक्षीत ठिकाणी साखरपा ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवली असल्याचे श्री. पोवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here