Kokan: देशात सर्वाधिक बेरोजगारी गोव्यात!

0
24
कोंकण रेल्वे पद भरतीसाठी मुदतवाढ
कोंकण रेल्वे पद भरतीसाठी मुदतवाढ

पणजी/🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार

गोवा- पीरिओडिक लेबर फोर्सचा २०२३-२०२४ चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत गोव्यात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे आढळून आले आहे. गोव्यात बेरोजगारीचा दर ८.७ टक्के असून राष्ट्रीय सरासरीच्या ४.५ टक्के डबल हा रेट आहे. २०२२-२३ मध्ये हा दर ९.७ टक्के होता. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत गोव्यातील बेरोजगारीत फक्त एका टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे नोकरीच्या बदल्यात भत्ता या गोवा सरकारच्या धोरणावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-न्हावेलीत-गव्या-रेड्यां/

गोव्यात महिलांच्या रोजगाराची स्थिती अत्यंत गंभीर आहे. गोव्यात महिलांच्या रोजगारीचा दर १६.८ टक्के आहे. तर राष्ट्रीय सरासरी ४.९ टक्के आहे. गोव्यात मजूरांची भागिदारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. गोव्यात ही सरासरी ३९ टक्के आहे तर देशात ४२.३ टक्के आहे.

गोव्यात ५५ टक्के लोक सेवा क्षेत्रात काम करतात. तर १९.७ टक्के लोक कृषी आणि ३०.५ टक्के लोक अन्य उद्योगात काम करत आहेत. पण सेवा क्षेत्र नवीन नोक-या देण्यात, खासकरून महिला आणि मुलांना नोक-या देण्यात अपयशी ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here