Kokan: दोडामार्ग तालुक्याचा स्थानिक उमेदवार विधानसभा निवडणुक रिंगणात

0
25
निवडणुक,आचारसंहिता
दोडामार्ग तालुक्याचा स्थानिक उमेदवार विधानसभा निवडणुक रिंगणात

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/दोडामार्ग

आडाळी गावचे सुपुत्र तथा दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक उमेदवार दत्ताराम गावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दाखल केला आहे. दत्ताराम गावकर यांनी कॉलेज जीवनापासून लढण्याचा जो पाया घातला आहे तोपर्यत लढतच आहे‌. दत्ताराम विष्णू गावकर याने विधानसभेला लढण्याचा निर्णय घेतला आहे तो विश्वास पंचक्रोशीत नक्कीच नवीन ऊर्जा निर्माण करेल. संघर्ष हे त्याचे हत्यार आहे.आणि आडाळीच्या माऊलीचा आशीर्वाद त्याची ढाल आहे‌. तुमच पाठबळ त्याची ऊर्जा आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-निवडणुकीमुळे-पोलिसांच्/

दत्ताराम गावकर पाणी प्रश्न असो, तिलारी धरणग्रस्थांचे आंदोलन असुदेत की तहसीलदार ऑफिस समोर जनतेच्या न्यायिक हक्का साठी उपोषण असुद्यात. त्यात दत्ताराम गावकर आजही पुढे असतात. मधल्या काळात मनसेचा पदाधिकारी झाल्यानंतरही त्याने बराच सामाजिक संघर्ष केला. आज अपक्ष म्हणून विधानसभेला सामोरे जाताना त्याची जिद्द वाखडण्याजोगी आहे. पैसा हा जरी निवडणुकीचा आज फंडा असला तरी दत्ताराम गावकर सारखी आर्थिक कमकुवत असणारी माणसं फक्त तुमच्या पाठबळावर ह्या निवडणुकीला न डगमगता सामोरी जात आहेत. स्थानिक उमेदवार ही त्याची जमेची बाजू आहे. आडाळी गावचे सुपुत्र तथा दोडामार्ग तालुक्यातील उमेदवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here