Kokan: नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा –  गणेश कुशे

0
40
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था,
नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा - गणेश कुशे

वेंगुर्ला प्रतिनिधी- जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावेच लागतील, तरच आपण यशाच्या राजमार्गावर पूढे जावू. नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था फोंडाघाटचे उपाध्यक्ष गणेश कुशे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पद्मश्री-डॉ-अनुराधा-पौड/

वेंगुर्ला तालुका वैश्य समाज संस्थेचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव आणि शैक्षणिक आर्थिक मदत वितरण कार्यक्रम साई मंगल कार्यालय येथे गणेश कुशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे, उपाध्यक्ष सुहास गवंडळकर, खजिनदार सुरेश भिसे, शिरोडा प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, म्हापण प्रतिनिधी आकाश नार्वेकर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी आणि पदवी परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनंत अशोक स्वार, श्रीमती विद्या महादेव शिरसाट आणि राजेश गुरूनाथ शिरसाटयांच्या देणगीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली. वैश्य समाज संस्थेच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यापारी माजी नगरसेवक राजीव राधाकृष्ण पांगम आणि निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ विष्णू गोवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होऊन संचालक पदावर वर्णी लागल्याबद्दल गणेश कुशे आणि सुनिल डुबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुक्यातील वैश्य समाजातील ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कपिल पोकळे यांनी केले तर आभार अमृत काणेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन अंधारी, अनुप काणेकर, राकेश सापळे, गणेश अंधारी, तन्मय मुळीक, आर्यन डुबळे यांनी परीश्रम घेतले.

फोटो ओळी – वेंगुर्ला तालुका वैश्य समाज संस्थेचावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here