कुडाळ/मनोज देसाई – एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशी पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय व कै. सौ.एस.आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ.विलासराव देसाई कला ,वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाट गावचे सुपुत्र व मुंबई स्थित व्यवसायिक तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्या दातृत्वातून तब्बल 200 सायकलींचे वाटप गरजू ,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले.सात ते आठ किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास सुखकर व्हावा हा सायकली देण्यामागचा त्यांचा प्रमुख उद्देश होता. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शाळांमध्ये-आता-होणार-पो/
संस्था व प्रशालेच्या गरजा वेळोवेळी जाणून किशोर पाटकर हे सातत्याने प्रशालेला विविध स्वरूपात देणगी देऊन दातृत्वाचा एक आदर्श त्यांनी समाजाला घालून दिला आहे. आपल्या पाट गावचे ऋण फेडण्याची त्यांची मनापासून इच्छा व मनोवृत्ती या दातृत्वातून दिसून येते .सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक वृंद, प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले . तसेच प्रशालेतील शिक्षिका यज्ञा साळगांवकर यांनी किशोर पाटकर यांच्या दातृत्वाची प्रशंसा व त्यांच्या प्रती ऋण आपल्या भाषणातून व्यक्त केले. गरजू, गरीब ,होतकरू विद्यार्थ्यांचे पालक व पंचक्रोशीतून त्यांनी केलेल्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरचे हास्य व आनंद आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच किशोर पाटकर यांच्या कार्यकर्तृत्वाची मिळालेली पोचपावती आहे अशा शब्दांत प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी किशोर पाटकर यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या भाषणातून व्यक्त केली .
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर कार्याध्यक्ष समाधान परब ,उपाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्यवाह अवधूत रेगे, देवदत्त साळगांवकर, सुभाष चौधरी, राजेश सामंत, दीपक पाटकर, नारायण तळावडेकर ,दशरथ नार्वेकर, सुधीर ठाकूर हे सर्व संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर ,शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे ,ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर, संदीप साळसकर ,यज्ञा साळगांवकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर व आभार पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी मानले.