Kokan: नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार

0
42
एसटीच्या ताफ्यात दिवाळीच्या मुहूर्तावर 110 खासगी बसेस, मुंबई ते रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर धावणार

मुबंई- खासगी बस कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विनावातानुकूलित शयनयान आणि आसन व्यवस्था असलेल्या स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. आता एसटी महामंडळाने फक्त शयनयान प्रकारातील विनावातानुकूलित ५० नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस केवळ कोकणात ‘रातराणी’ म्हणून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सध्या राज्यात एसटीच्या २५६ मार्गांवर ५०० हून अधिक बसगाड्या ‘रातराणी’ म्हणून धावत असून यात साध्या, निमआराम, तसेच शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसचा समावेश आहे. शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये ३० पुश बॅक आसन व १५ शयनयान अशी प्रवासी क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here