Kokan: नाताळनिमित्त सजावटीचे साहित्य दाखल

0
32
नाताळनिमित्त सजावटीचे साहित्य दाखल

वेंगुर्ला प्रतिनिधी– नाताळ सणाच्या निमित्ताने विविध सजावटीचे साहित्य वेंगुर्ला बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. ख्रिश्चन समाजाकडून या साहित्याची खरेदीही केली जात आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-नितेश-मानवरची-ट्रॅकिग-कॅ/

ख्रिश्चन बंधूभगिनी येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ या सणाने साजरा करतात. या सणाला प्रारंभ व्हायला दोन दिवस राहिले आहेत. या सणाच्या निमित्ताने चर्च आणि घरोघरी आकर्षक सजावट करून येशु ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा बनवितात. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारात सजावटीचे विविध साहित्य दाखल झाले आहे. यामध्ये चांदणी, ख्रिसमस ट्री, मेणबत्त्या, सांताक्लॉज कॅप, येशु ख्रिस्ताच्या जन्माचा कागदी देखावा यांसह अन्य वस्तूंचा समावेश आहे. 

फोटोओळी – वेंगुर्ला बाजारपेठेत नाताळ सणाला लागणा-या विविध सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here