दापोली- अनादी काळापासून माणूस वाचन करीत आला आहे. निरंतर वाचनाची सवय व्यक्तिमत्त्व घडविते असे उद्गार दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी दापोलीतील एन. के. वराडकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या दापोली पंचायत समिती दापोली तालुकास्तरीय महावाचन मेळाव्यातील मनोगतात व्यक्त केले. यावेळी आयोजित स्वागत व उदाघाटन समारंभासाठीच्या व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष तथा एन. के. वराडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड, सहायक गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र सांगडे, पद्मन लहांगे, केंद्रप्रमुख सुनील कारखेले, प्रविण काटकर, श्रीकांत बापट, लक्ष्मण क्षीरसागर, जंगम, जुवेकर, सर्व विषय साधन व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-अंजनारी-ते-वाटुळ-या-मुंब/
समग्र शिक्षा दापोली पंचायत समिती आयोजित महावाचन महोत्सवाचा एक भाग म्हणून दापोली तालुकास्तरीय महाग्रंथमहोत्सव नुकताच दापोली येथील एन.के. वराडकर महाविद्यालयात फार मोठ्या उत्साहात पार पडला. या ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. ग्रंथमहोत्सवात अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी स्वलिखित साहित्य व वाचलेल्या साहित्याबाबतचे अभिप्राय व्यक्त केले.
दापोली येथील गोखले वाचनालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, मुरुड येथील महर्षी कर्वे वाचनालय, एन. के. वराडकर ग्रंथालय, गावतळे हायस्कूल ग्रंथालय, माटवण हायस्कूल ग्रंथालय, ए.जी. हायस्कूल ग्रंथालय आदी ग्रंथालयातील शेकडो पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ दापोली तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी घेतला. या ग्रंथ महोत्सवात सुनील खरात, अण्णासाहेब बळवंतराव, डाॅ. भारत कराड यांनीही महावाचन महोत्सव व ग्रंथ महोत्सवाच्या आयोजनाबद्दलचे आपले विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर यांनी केले तर विद्या सार्दळ यांनी सर्वांचे आभार मानले.