राजापूर-: आपल्या कार्यकतृत्वाने व कुशल संघटन कौशल्याने माजी खासदार व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गातच नव्हे तर संपुर्ण राज्यात सर्वसामान्यांचे हक्काचे नेतृत्व अशी आपली ओळख निर्माण केलेली आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची आज खरी गरज असून त्यांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती भाजपाचे जिल्हासरचिटणीस रविंद्र नागरेकर यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्हयातील तमाम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त व जनतेची ही मागणी असल्याचे नागरेकर यांनी नमुद केले आहे .बुधवारी राजापुर शासकिय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत नागरेकर यांनी समस्त राजापूर तालुक्यातील व रत्नागिरी जिल्हयातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. https://sindhudurgsamachar.in/kokan-नैसर्गिक-आपत्तीमुळे-नुक/
रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार व भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी मंगळवारी आपण सक्रीय राजकारणातुन बाजुला होत असल्याची पोस्ट शोशल मियावर टाकली होती. त्यांच्या या निर्णयामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली. अनेकांनी थेट मुंबईत निलेश राणे यांची भेट घेण्यासाठी धाव घेतली.
बुधवारी नागरेकर यांनी यावर आपली भूमिका मांडली. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निलेश राणे यांनी केलेले काम आजही लोक विसरलेले नाही, मात्र त्यानंतरही कायम रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयात संपर्कात राहून कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ देत त्यांनी पक्ष संघटन अधिक बळकट केले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी न्याय दिला आहे. राजापुरातील टोल विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करताना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. तर मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला असो वा अन्य कोणताही प्रश्न असो, निलेश राणे यांनी सर्व अधिकारी आणि ठेकेदार कंपनीला धारेवर धरत ते प्रश्न सोडविले आहेत. असे एक नाही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून न्याय दिला असल्याचे नागरेकर यांनी सांगितले. विद्यमान आमदार, खासदार हे काहीच करू शकत नाहीत याची जनतेला कल्पना आहे. सर्व सामान्य कार्यकर्तें आणि जनतेला त्यांचे नेत़ृत्व करण्यासाठी ते आंम्हाला हवे असल्याचेही असेही नागरेकर यांनी नमुद केले. एक कतृत्ववान नेतृत्व म्हणून जनतेच्या हदयामध्ये निलेश राणेंचे स्थान आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयात आणि राज्यात तरूणांचे स्फुर्तीस्थान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची पध्दत, संघटन कौशल्य यामुळे ते पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार होऊ शकतात. तर ते ज्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आहेत तेथून ते आमदार होऊ शकतात. त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे, त्यामुळे त्यांनी आपला राजकारणातुन बाजुला होण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी आमची सर्व रत्नागिरीतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेची त्यांना कळकळीची विनंती असल्याचे नागरेकर यांनी नमुद केले. आंम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत तुंम्ही आंम्हाला हवे आहात व यापुढेही राहू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असेही नागरेकर यांनी नमुद केले. तुंम्ही तुमचे काम पुन्हा एकदा जोमाने तुमचे काम सुरू करा आंम्ही सोबत आहोत जनता सोबत आहे असेही नागरेकर यांनी नमुद केले.
याप्रसंगी भाजपाच्या पश्चिम मंडळचे तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, महिला आघाडी प्रमुख सौ. सुयोगा जठार, दीपक बेंद्रे, प्रा. मारूती कांबळे, विजय कुबडे, समिर खानविलकर, अरवींद लांजेकर, आशिष मालवणकर, संदेश आंबेकर, वसंत पाटील,राजा खानविलकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.