वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला तालुक्यातही घरोघरी गुढी उभारुन हिदू मराठी नूतन वर्षाचे स्वागत करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-धुळवडीने-शिमगोत्सवाची-स/
चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी प्रत्येकजण आपल्या दारात गुढी उभारुन नविन वर्षाचे स्वागत करतो. आज सकाळपासून ते दुपारपर्यंत या ठिकठिकाणी गुढी उभारण्याचे काम सुरु होते. विविध वस्त्र परिधान केलेल्या उंचच उंच गुढ्यांनी लक्ष वेधून घेतल्या. तर काही घरांमध्ये नूतन पंचांग वाचनही करण्यात आले.
फोटोओळी – दाभोली येथील दत्तमंदिर परिसरात गुढी उभारण्यात आली.