⭐ शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ- नेरूर येथील वाघचौडी येथील श्री.शाम गावडे सह ग्रामस्थ दि.२६ जानेवारी २०२४ रोजी उपोषणास बसले होते. त्यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांना समजताच त्यांनी तातडीने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न समजून घेतले. प्रकल्पग्रस्त शेतकरी श्री.शाम गावडे सह ग्रामस्थ यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली व त्याचा प्रत्यक्ष पाठपुरावा देखील केला. त्यांनी उद्योगमंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब ,शिवसेना नेते, सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांना उपोषणकर्त्यांचे प्रश्न सांगितले होते. नेरूर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी श्री.शाम गावडे सह ग्रामस्थ यांच्या मागण्या अखेर औद्योगिक विकास महामंडळाकडून मान्य केल्या https://sindhudurgsamachar.in/kokan-हुमरमळा-गावातील-जनतेने-प/
सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांचा दि.०८ मार्च २०२४ रोजीचा नियोजित दौरा होता. या दौऱ्यात प्रत्यक्ष भैय्या सामंत यांची शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात भेट घडवून आणली. दोन दिवसातच त्यांनी स्मशानभूमी भूखंड क्र. ओएस-९ मधून जोडरस्ता व भूखंड क्र.ओएस-२४ मधील ३ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी देऊन हे दोन्ही प्रश्न निकाली काढले. हीच जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कामाची पोच पावती आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचे औद्योगिक विकास महामंडळ प्रकल्पग्रस्त शेतकरी श्री.शाम गावडे,श्री.सुरेश गावडे,श्री.जयराम परब,श्री.बाळकृष्ण गावडे,श्री.अजित मार्गी,श्री.विजय गावकर,श्री.उमाकांत तांबे,श्री.जगन्नाथ गावडे,श्री.मंगेश राऊत,सौ.शिल्पा गावडे,सौ.निकिता गावडे,श्री.तुषार गावडे,श्री.चिन्मय राणे,श्री.महादेव मार्गी,श्री.प्रभाकर गावडे,श्री.विजय धुरी,श्री.राजेश सडवेलकर,श्री.लक्ष्मण महाजन,श्री.शंकर गावडे,श्री.महेश राणे यांनी आभार व्यक्त केले. तसेच येत्या दौऱ्यात शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांचा प्रकल्पग्रस्त शेतकरी जाहीर सत्कार करणार आहेत अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने दिली.