Kokan: न्यायालयाने स्थगिती उठविलेल्या २ कोटी १५ लाखाच्या आकेरी माणगाव शिवापूर रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

0
73
भूमिपूजन,
न्यायालयाने स्थगिती उठविलेल्या २ कोटी १५ लाखाच्या आकेरी माणगाव शिवापूर रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

कुडाळ – दुकानवाड पुलाच्या ठिकाणाची आ. वैभव नाईक यांनी पाहणी केली. कुडाळ तालुक्यातील आकेरी माणगाव शिवापूर ग्रा.मा. १९० या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट मार्च २०२२-२३ अंतर्गत २ कोटी १५ लाख रु. मंजूर केले आहेत. या कामाला प्रशासकीय मान्यता १३/०२/२०२३ रोजी अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आली आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकारने या कामाला स्थगिती दिली होती.न्यायालयाने हि स्थगिती उठविण्याचे आदेश दिल्याने आता हे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन आज आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-रात्रो-९-३०-नंतर-वाहतूक-न/

त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील दुकानवाड पूलासाठी अर्थसंकल्प बजेट २०१९-२० अंतर्गत ४ कोटी ५० लाख रु. मंजूर करून घेतले आहेत. या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय २५/०२/२०२० रोजी झालेला आहे. यावर्षी हे काम मार्गी लावले जाणार आहे. दुकानवाड पुलाच्या ठिकाणाची पाहणी आज आ. वैभव नाईक यांनी केली. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी वसोली सरपंच अजित परब व हळदीचे नेरूरचे माजी सरपंच सागर म्हाडगूत यांनी याप्रसंगी बोलताना हि दोन्ही कामे आ. वैभव नाईक यांच्याच माध्यमातून मंजूर झाल्याचे सांगितले. गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुकानवाड पुलाची मागणी केली जात होती. याआधीचे आमदार गाडीतून केवळ हात दाखवून जात होते मात्र आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांची पुलाची मागणी पूर्ण केली आहे असे सांगत समाधान व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि.प. सदस्य राजू कविटकर, श्रेया परब,मथुरा राऊळ,स्वप्नील शिंदे, निलेश सावंत, वसोली सरपंच अजित परब, शिवापूर उपसरपंच महेंद्र राऊळ, वसोली उपसरपंच सदानंद गवस, ग्रा. प. सदस्य प्रियांका परब, सुरेखा डांगी, दीक्षा तवटे,निवास कारुडकर,हळदीचे नेरूरचे माजी सरपंच सागर म्हाडगूत, उपवडे येथील जेष्ठ ग्रामस्थ श्री कविटकर, श्रीकृष्ण परब, महादेव राऊळ,बापू सावंत,संतोष सावंत,सखाराम भर्डे, ऋतिक परब,वनिता सावंत आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

       

  
        
          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here