Kokan: पणत्या रंगवताना मुले खूप काही शिकतात : निकेत पावसकर

0
49
प्रज्ञांगण,निकेत पावसकर, पणती ,
पणत्या रंगवताना मुले खूप काही शिकतात : निकेत पावसकर

प्रज्ञांगण आयोजित पणती रंगविणे कार्यशाळेला प्रतिसाद
उमेद फाऊंडेशनला देण्यात येणार पणत्या

तळेरे, दि. 14 :
पणती रंगविणे ही परंपरा केवळ सौंदर्याचे किंवा मांगल्याचे प्रतीक नसून, त्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक हेतूही आहे. पणतीमध्ये दिवा लावणे हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा विजय दर्शवतो, तसेच सकारात्मकतेचा प्रसार करण्याचे प्रतीक मानले जाते. मुलांच्या दृष्टीने, पणती रंगवणे ही एक कला म्हणून त्यांचे सर्जनशील कौशल्य विकसित करण्याचा मार्ग ठरू शकतो. यामुळे त्यांच्यात धैर्य, संयम आणि कल्पकता वाढते. रंगकाम करताना मुलं विविध रंगांचे मिश्रण, रचनात्मकता आणि सौंदर्यशास्त्र शिकतात, जे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी मदत करते, असे प्रतिपादन संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

तळेरे येथील प्रज्ञांगणने आयोजित केलेल्या पणती रंगविणे कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी सकाळी ही कार्यशाळा झाली. त्यामध्ये 30 मुलांनी सहभाग घेतला. यावेळी शुभम खानोलकर यांनीही मुलांना विशेष मार्गदर्शन केले. दिवाळीच्या तोंडावर सर्वांना वेड लावतात त्या सुंदर आणि आकर्षक अशा पणत्या. या पणत्या रंगविण्याची मजा मुलांना अनुभवता यावी आणि मोबाईल पासून मुले थोडी लांब रहावीत, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्रात-एकाच-टप्य/

या सर्व मुलांना प्रमुख मार्गदर्शक शुभम खानोलकर यांनी पणत्या रांगविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी या सर्व सहभागी मुलांना रंगविण्यासाठी 4 पणत्या देण्यात आल्या. त्यातील 2 पणत्या ह्या रंगवून उमेद च्या दिवाळीतील उपक्रमासाठी देण्यात आल्या. आणि 2 पणत्या मुलांना घरी देण्यात आल्या.

दरवर्षी तळेरे येथील प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्यावतीने उमेद फाऊंडेशनला सुमारे 500 पणत्या भेट देण्यात येतात. उमेद फाऊंडेशनकडून दिवाळी निमित्त समाजातील होतकरू कुटुंबाला विविध वस्तू संच देण्यात येतो, त्यातून या मुलांनी रंगविलेल्या पणत्या देण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेतील सर्व सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उमेद फाऊंडेशनचे नितीन पाटील, जाकीर शेख, कार्यशाळा मार्गदर्शक शुभम खानोलकर, प्रज्ञांगण च्या सौ. श्रावणी मदभावे, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन चे संचालक सतीश मदभावे, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, पालक अजित कानेटकर, वर्षा कांबळी, खुशी गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी सहभागी अनेक मुलांनी या कार्यशाळेमुळे आम्हाला पणत्या रंगविण्याचा आनंद घेता आला. आम्हाला आमच्या आवडीचे काम करता आले आणि ते आम्ही मनापासून केले, अशा प्रतिक्रिया दिल्या.

छायाचित्र :

  1. तळेरे : येथे आयोजित केलेल्या पणती रंगविणे कार्यशाळेत मुलांनी सुबक अशा पणत्या रंगविल्या. या कार्यशाळेत पणत्या रंगविण्याच्या कामात असताना मुले दिसत आहेत
  2. तळेरे : येथे आयोजित केलेल्या पणती रंगविणे कार्यशाळेत सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here