Kokan : पणदूर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

3
228
पणदूर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
पणदूर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

कुडाळ-( गोपाळ पावसकर ) : पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली . प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी कु. धनराज गुरव टी. वाय .बी. कॉम , कु.सानिका मेस्त्री एस वाय. आयटी.,कु. संपदा पालव टी .वाय बी. बी आय,कु. गौरी माने टी.वाय बी .बी .आय., कु.गॅरीयन मान्येकर एफ.वाय .आय. टी. यांनी टिळकांच्या जीवन व कार्यालयाबद्दल भाषणे केली. डॉ. संभाजीराव शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगतातून लोकमान्यांच्या आयुष्यातील ठळक घटना, तसेच प्रेरक व उपयुक्त माहिती सांगत त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला.https://sindhudurgsamachar.in/kokan-वातावरणातील-वाढत्या-ताप/

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भाग्यश्री गावडे यांनी केले . महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वनिता गुरव यांनी सूत्रसंचालन तर प्रा. प्रसाद ओटवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.