वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-सुंदरभाटले येथील रहिवासी, निवृत्त एसटी कर्मचारी हरिविजय उर्फ भाऊ भगत यांचा सलग ५० वर्षे नाट्यसंहिता लिहिल्याबद्दल वांद्रेश्वर कला क्रीडा मंडळातर्फे रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक भैय्या गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-विद्यार्थी-गुणगौरव-व-शिक/
सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव २३ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. यावेळी श्रीसत्यनारायणाची महापूजा तसेच रात्रौ भाऊ भगत लिखित पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘सिमन्तिनी‘ हा विशेष नाट्यप्रयोग सादर झाला. यावेळी बहुसंख्य नाट्यरसिक उपस्थित होते. या उत्सवाच्या निमित्ताने हरिविजय उर्फ भाऊ भगत हे पुराणाचा अभ्यास करून दरवर्षी आगळावेगळी नाट्यसंहिता काढत आहेत. यंदाचे हे त्यांचे ५०वे वर्षे होते. त्यांनी लिहिलेली नाट्यसंहिता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ सादर करीत असतात. भाऊ भगत यांच्या या कार्याची दखल घेऊन वांद्रेश्वर कला क्रीडा मंडळातर्फे रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (वेंगुर्ला) संचालक तथा पत्रकार प्रथमेश उर्फ भैय्या गुरव यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वांद्रेश्वर मंडळाचे दादा सोकटे, अजित कनयाळकर व पार्सेकर दशावतार नाट्य मंडळातून संगीत साथ करणारे प्रकाश सावंत, राकेश रेडकर व भरत लाड उपस्थित होते. सुंदरभाटले येथे सादर होणारे दशावतारी आख्यान इतर ठिकाणही सादर करावे अशी मागणी पार्सेकर दशावतार मंडळाकडे केली जाते हे आम्हाला भूषणावह असल्याचे दादा सोकटे यांनी सांगितले.
फोटोओळी – वांद्रेश्वर कला क्रीडा मंडळातर्फे ५० वर्षे नाट्यसंहिता लिहिणारे भाऊ भगत यांचा सत्कार करण्यात आला.