Kokan: परतीच्या प्रवासा दरम्यान मच्छीमारी बोटीचा अपघात दोन खलाशांचा मृत्यू

0
13
मच्छीमार बोट अपघात,
परतीच्या प्रवासा दरम्यान मच्छीमारी बोटीचा अपघात दोन खलाशांचा मृत्यू

⭐ही घटना मध्यरात्री निवती समुद्रात रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली –

वेंगुर्ला/संदिप चव्हाण- निवती समुद्रातून मच्छीमारी करून येत असताना निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांच्या मालकीची ( धनलक्ष्मी) बोट समुद्रात पलटी होऊन दोन खलाशांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये एकूण १४ खलाशी होते. ही घटना मध्यरात्री रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली .या घटनेची माहिती मिळताच निवती सरपंच अवधूत रेगे यांनी मध्यरात्री घटनास्थळी तात्काळ धाव घेतली . https://sindhudurgsamachar.in/maharashtra-अंबाबाई-चरणी-अविरत-सेवे/

याविषयी सविस्तर माहिती अशी ती शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांच्या मालकीची असलेली बोट दररोज प्रमाणे १४ खलाशांना घेऊन समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या नंतर मासेमारी करून निवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्याजवळ असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रित येतात त्या ठिकाणीही दुर्घटना घडली. समुद्रकिनाऱ्यापासून २०० मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली आहे .यातील १४ खलाश्यांपैकी दोन खलाश्यांचा मृत्यू झाले आहे .त्यात मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर वय 58 वर्ष हे श्रीरामवाडी येथील आहेत. पराडकर यांचा मृत्यू बोट पलटी होऊन जाळ्यात अडकून राहिल्यामुळे झाला तर दुसरे मृत व्यक्ती रघुनाथ उर्फ भाऊ येरागी खलाशी हे खवणे येथील आहेत. त्यांचे वय ४८वर्षे असून हे दोन्ही खलाशी बाजुच्या गावातील वेंगुर्ले तालुक्यातील आहेत.

या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर तरी निवती गावांसह पंचक्रोशीतीत शोककळा पसरली आहे. या मृत झालेल्या खलाशांची निवती पोलीस ठाण्यात नोंद केली असून त्यांना परुळे येथे शवविच्छेदन साठी आणण्यात आले होते अशी माहिती निवती ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे यांनी दिली.

यावेळी मदतकार्यासाठी निवती सरपंच अवधूत रेगे ,उपसरपंच गोविंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत मेतर माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग, अन्य निवती ग्रामस्थ मदत करण्यासाठी धावून आले. तसेच या घटनेची माहिती मिळतात शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी परुळे प्राथमिक केंद्र तसेच मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेट देत सांत्वन करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या तर्फे तात्काळ स्वरूपाची आर्थिक मदतही यावेळी करण्यात करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई ,विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here