🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /कुडाळ /मनोज देसाई
माड्याचीवाडी, आंदुर्ले,हुमरमळा पाट, म्हापण येथील विविध देवालात दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री देव रामेश्वर मंदिर , हुमरमळा येथे १४ रोजी सायं.हभप स्नेहल बुवा यांचं कीर्तन, तर, हुमरमळा स्वामी समर्थ मठ (दादा महाराज देसाई) येथे ह.भ.प. केळुसकर बुवा यांचे सायं५ वा कीर्तन, होणार आहे. आंदुर्ले दत्त मंदिर (कुंभार भाटले) येथे सायंकाळी दत जन्माचे कीर्तन होणार आहे. तसेच म्हापण दत्त मंदिरात सायंकाळी कीर्तन होणार आहे. व पाट देसाईवाडा येथे पहाटे दत्त जयंती उत्सव होतो. माड्याचीवाडी , गावडोबा मंदिरातही दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वरील सर्व विविध दत्त जयंती कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबई-आणि-भारतासाठी-ख/