Kokan: परिस्थितीसमोर हतबल होऊन पती पत्नीने अखेर मृत्यूला कवटाळले 

0
50
कोकण रेल्वे,
कोकण रेल्वेच्या धडकेत सावंतवाडी शहरातील एका इसमाचा मृत्यू - -

चिपळूणमधील हृदयद्रावक घटना 

चिपळूण : घरच्यांनी विरोध केला म्हणून कोल्हापूर येथून चिपळूण येथे येऊन संसार करणाऱ्या पती पत्नीने वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाचवेळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून प्रेमासाठी जगाशी भांडणार्या दोघांनी परिस्थितीसमोर हतबल होऊन हे भयानक पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-केंद्र-शाळेच्या-वि/

मिळालेल्या माहितीनुसार शरद शिवगोंड पाटील (४२) व स्वाती शरद पाटील (४०, दोघेही सध्या रा. पिंपळी) यांनी दोन्ही बाजूच्या घरच्यांचा विरोध डावलून सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र त्यामुळे सासर-माहेर दोन्हीकडचे नाते तुटले. मात्र तरीही न डगमगता दोघांनी कोल्हापूर सोडून थेट चिपळूण गाठले. हमाली व धुण्याभांड्याची कामे करून दोघांनी आपला संसार चालवण्याचा प्रयत्न केला. हे दाम्पत्य मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे रहिवासी होते. शाळेत असतानाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

७ वर्षांपूर्वी त्याचा प्रेमविवाह झाला. मात्र हा प्रेमविवाह त्यांच्या नातेवाइकांना मान्य नव्हता. त्यांनी या लग्नाबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने या दोघांनी कोल्हापूर सोडून चिपळूण गाठले. चिपळूण कराड रस्त्यावरील पिपळी येथील सुर्वे यांच्या चाळीत भाड्याने राहण्यास सुरुवात केली. नातेवाइकांनी त्यांच्याकडे येणे जाणे पूर्णपणे बंद केले होते. स्वाती यांचे एम.ए., बी.एडपर्यंतचे शिक्षण झाले होते. शरद पाटील यांचे अकरावीपर्यंत शिक्षण झाले आहे. स्वाती यांनी काहीकाळ गावात शिक्षक म्हणून नोकरी केली होती. प्रेमविवाहामुळे चिपळुणात आल्यानंतर शरद यांनी हमालीचे काम, तर स्वाती यांनी चार घरातील धुणीभांडी करून संसार फुलवला. 

सारे काही सुरळीत सुरू असतानाच वर्षभरापूर्वी शरद यांना मणक्याचा त्रास सुरू झाला आणि काही दिवसात त्यांच्या कमरेखाली हालचाली बंद त्यामुळे अपंगत्व आलेल्या शरद पाटील यांचे काम थांबले. त्यातून दोघांमध्ये नैराश्य निर्माण झाले. अखेर आजाराला कंटाळून शरद पाटील यांनी घरातच आत्महत्या केली, तर त्याचवेळी स्वाती यांनी नजीकच्या कॅनॉलमध्ये उडी घेऊन जीवन संपवले. त्यांचा मृतदेह वाशिष्ठी नदी पात्रात बहादूरशेख पूल येथे आढळला. त्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पिंपळी परिसरात चौकशी केली तेव्हा त्यांच्या पतीनेही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून बुधवारी दुपारी नातेवाइकांच्या उपस्थितीत शहरातच अंत्यसंस्कार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here