Kokan: पर्यावरण व वातावरण बदल विभागाकडून विविध उपक्रमांची पहाणी

0
35
माझी वसुंधरा अभियान,
पर्यावरण व वातावरण बदल विभागाकडून विविध उपक्रमांची पहाणी

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे, संचालक अभिजित घोरपडे व जॉय ठाकूर यांनी १२ एप्रिल रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला येथे भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रक्रिया केंद्रांची पाहणी केली.https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-देव-ब्राह्मण-देवस्थ/

 तत्पूर्वी मान्यवरांना ‘स्वच्छता‘ या संकल्पनेवर आधारित विविध चित्रफिती दाखवून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण विकास कामांची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेच्या सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प यांची पाहणी केली. कंपोस्ट डेपो येथे ‘वेस्ट टू बेस्ट‘ संकल्पनेनुसार विकसीत करण्यात आलेल्या ‘मिरॅकल पार्क‘ व ‘यमदोरी गार्डन‘ यांना भेट दिली. कच-यातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून नाविन्यपूर्ण कलाकृती बनवून वेंगुर्ला नगरपरिषदेने आपले वेगळेपण जपत असल्याबाबत भेटी देणा-या मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी अरविद नातू, सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, प्रा.धनश्री पाटील, प्रभारी स्वच्छता निरिक्षक वैभव म्हाकवेकर, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापक जयेंद्र चौधरी, मुकादम संतोष जाधव व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

 माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात आलेले फुलपाखरू महोत्सव, स्विफ्टलेट पक्षी संरक्षण, सुरंगी वरील संशोधन, वृक्षारोपण मोहिम, सौरऊर्जा प्रकल्प, कांदळवन व्यवस्थापन आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली. तर पाणथळ जागांच्या संवर्धनाबाबत नगरपरिषदेने बनविलेला अहवाल सादर करण्यात आला.

फोटोओळी – पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या अधिका-यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन केंद्रास भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here