Kokan: पावशी येथे सोहम तेजस स्पोर्टस आयोजित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

0
17
पावशी येथे सोहम तेजस स्पोर्टस आयोजित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न
पावशी येथे सोहम तेजस स्पोर्टस आयोजित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन स्पर्धेला दिल्या शुभेच्छा : बॉयफ्रेंड कुडाळ संघ प्रथम तर किंगस्टार लक्ष्मीवाडी कुडाळ संघ द्वितीय

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

पावशी: सोहम तेजस स्पोर्टसच्या वतीने पावशी शेलटेवाडी येथे भव्य केपीएल बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा २१ ते २३ एप्रिल रोजी संपन्न झाली. या स्पर्धेप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. प्रेक्षणीय सामन्याची नाणेफेक त्यांच्या हस्ते करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-मठ-येथे-सर्वा/

या स्पर्धेत प्रथम क्रमांक बॉयफ्रेंड कुडाळ, द्वितीय क्रमांक किंगस्टार लक्ष्मीवाडी कुडाळ,तृतीय क्रमांक गवळदेव सेवन, चतुर्थ क्रमांक देवेंद्र स्मृती कुडाळ यांनी पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी सोहम तेजस स्पोर्टस अध्यक्ष महेश आळवे,पावशी ग्रा. प सदस्य काका भोगटे, युवासेना उप तालुकाप्रमुख सागर भोगटे, अमित राणे,गुरु गडकर,शैलेश काळप, प्रसाद शेलटे, निलेश आळवे, कृष्णा आळवे, सदा अणावकर, राजू पाटणकर आदी उपस्थित होते.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here