कुडाळ | प्रतिनिधी- : पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा शब्द निलेश राणे यांनी पावशी ग्रामस्थांना दिला आहे. यामुळे नागरिकात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी करून दाखविले असे बोलले जात आहे. पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत सर्व्हिस रोडचे काम आता लवकरच होणार आहे. याबाबत पावशी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन या कामाबाबत माहिती दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंतच्या अंतरावर ग्रामपंचायत, तलाठी, रास्त धान्य दुकान अशी विविध कार्यालय आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोर एस. टी. बस थांबा आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य चौपदरीकरण रस्त्याच्या बाजूने चालत तसेच वाहने घेऊन यावं लागतं असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या कारणामुळे गेल्या चार वर्षापासून पावशी ग्रामस्थ उबाठा शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्याकडे लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत जाणारा पावशी सर्व्हिस रस्ता सर्विस रोड म्हणून करावा अशी मागणी करत होते. मात्र या मागणीला उबाठा शिवसेनेच्या खासदार आमदाराने कानाडोळा केला. म्हणून पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आणि दोन महिन्यांत पावशी ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला. याबाबत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमवेत अधिकाऱ्यांची पावशी ग्रामपंचायत येथे बैठक घेतली या बैठकीत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. हा सर्विस मार्ग लवकरच होणार असल्याचे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सांगितलhttps://sindhudurgsamachar.in/kokan-माझे-कोकण-माझे-स्वर्ग/
पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी बोलताना सांगितले की, गेली चार वर्षे या संदर्भात आम्ही सातत्याने आमदार व माजी खासदार यांच्याशी वेळोवेळी भेट घेऊन चर्चा केली मात्र त्यांनी अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. आम्ही महामार्ग अडवला सर्वांवर गुन्हे दाखल झाले मात्र प्रश्न तसाच राहिला, शेवटी निलेश राणे यांच्याजवळ जाऊन आमची समस्या मांडल्यावर तत्काळ कार्यवाही करत त्यांनी विषय मार्गी लावला, आता लवकरच काम सुरू होईल याचा आनंद आपल्याला होत आहे असे सांगितले.