Kokan: पेंडुर येथील दशावतार कलाकार नारायण उर्फ राजन गावडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन

0
96
दशावतार कलाकार नारायण उर्फ राजन गावडे यांचे आज अल्पशा निधन
दशावतार कलाकार नारायण उर्फ राजन गावडे यांचे आज अल्पशा निधन

दशावतार नाट्य कंपनीतून काॅमेडी भुमिकेसह राजाची तसेच नारदाची भुमिका करून आपल्या अभिनया”तून आपले नाव संपूर्ण सिंधुदुर्गसह महाराष्ट्र,गोवा आदी राज्यातील दशावतार प्रेमींना भुरळ पाडणारे पेंडुर – दुकानवाडी येथील दशावतार कलाकार नारायण उर्फ राजन गावडे (वय वर्षे ४८) यांचे आज अल्पशा आजाराने राहत्या घरी सायंकाळी ५ -३० च्या दरम्यान निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,दोन सख्ये भाऊ,भावजय,पुतणे,आदी मोठा परिवार आहे.

राजन गावडे यांच्या निधनाने पेंडुर गावासह सिंधुदुर्गात शोककळा पसरली आहे.

दशावतारी कलाकार राजन गावडे यांच्यावर उद्या शुक्रवारी सकाळी ८ च्या दरम्यान पेंडुर मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.

सिंधुदुर्ग:-कोकणच्या लोककलेतील एक महत्वपूर्ण घटक म्हणजे दशावतार, दशावतार क्षेत्रात आजपर्यंत अनेक लहान मोठे कलाकार होऊन गेले आणि सध्या कार्यरत सुद्धा आहेत.अशातचं पेंडूर गावचे सुप्रसिद्ध दशावतार कलाकार राजन गावडे यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून वेंगुर्ले तालुक्यातील पारर्सेकर दशावतार नाट्य कंपनीतून आपली दशावतार कलेला सुरुवात केली.सुरुवातीला त्यांनी “नारदा”ची भुमिका साकारली.त्यानंतर हनुमान, ब्रम्हराक्षस,राजा यासह काॅमेडी भुमिकाही अप्रतिम साकारल्या आहेत.तसेच राजन गावडे हे दशावतार नाट्यमंडळात कुठलीही भुमिका दिली तरी ती अप्रतीम साकारत असत.त्यांचा आज नावलौकिक सर्व आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-विद्युत-वितरण-कंपनीचा-जी/

तसेच राजन गावडे यांनी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले,जय हनुमान नाट्य मंडळ आरोस,कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर,चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेदवण,मामा मोचेमाडकर नाट्य मंडळ मोचेमाड आदी दशावतार नाट्य कंपनीतून त्यांनी आपल्या अभिनयातून दशावतार क्षेत्रात आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here