Kokan: प्रणिता मोंडकर, श्राव्या कांबळी व दिप्ती गवसकर प्रथम

0
31
प्रणिता मोंडकर, श्राव्या कांबळी व दिप्ती गवसकर प्रथम
पहिल्या नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनात प्रणिता मोंडकर, श्राव्या कांबळी व दिप्ती गवसकर प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी– ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या पहिल्या नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तुळस येथे घेतलेल्या कथाकथन स्पर्धेत प्रणिता मोंडकर (सरस्वती विद्यालय टांक), स्वराज मसुरकर (कुडाळ हायस्कूल), हर्षिका रगजी (सरस्वती विद्यालय टांक) यांनी अनुक्रमे तीन व स्नेहा वेंगुर्लेकर व श्रावणी परब यांनी उत्तेजनार्थ तसेच वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात श्राव्या कांबळी (उभादांडा नं.१), आदिती चव्हाण (एम.आर.देसाई स्कूल), सोनल मराठे (शिवाजी हायस्कूल तुळस) यांनी प्रथम तीन तर शंभू पांढरे (निरवडे) व स्वरा आरोसकर (न्यू इंग्लिश स्कूल मातोंड) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. https://sindhudurgsamachar.in/kokan-कवी-संमेलनातून-अटलजींना/

वक्तृत्व स्पर्धेच्या मोठ्या गटात दिप्ती गवसकर (सरस्वती हायस्कूल टांक), रश्मी भगत (मठ हायस्कूल), तनया जाधव (न्यू इंग्लिश स्कूल मातोंड) यांनी प्रथम तीन तर रिया परब (न्यू इंग्लिश स्कूल मातोंड) व अमृता नवार (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले.

कथाकथन स्पर्धेचे परिक्षण वृंदा कांबळी व अजित राऊळ यांनी तर वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण बी.टी.खडपकर व संजय पाटील यांनी केले.

फोटोओळी – विविध स्पर्धेतील विजेत्यांसमवेत परिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here