Kokan: फरसाण कारखान्यातील एक लाख रु. घेऊन कामगार पसार

0
36
रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले
रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले

ओरोस, दि-१६:– ओरोस-खर्येवाडी येथील एका फरसाण कारखान्यातील तीन कामगारांनी एक लाख आठ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. या प्रकरणी लखन रजपूत, श्रवण रजपूत, बळीराम रजपूत (रा. उत्तरप्रदेश) या तीन संशयितांवर संगनमताने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील भरणी येथील करण परब यांनी ओरोस-खर्येवाडी येथे करण एन्टरप्रायजेस नावाने फरसाण बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लवकरच-राज्यपालनियुक्त/

या कारखान्यात तीनही संशयित कामगार होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. ते आटोपून १५ रोजी पहाटे तीनच्या सुमारास करण परब यांच्यासह तीनही कामगार कारखान्यातच झोपले होते. सोमवारी सकाळी फरसाणची डिलिव्हरी करण्यासाठी जायचे असल्याने करण यांनी १ लाख ८ हजारांची रोकड सोबत ठेवली होती. सकाळी ते उठले असता सोबतचे कामगार व रोकड जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात देत तीनही कामगारांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे संशयितांवर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३०६, ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. रोकड घेऊन पोबारा केलेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप गोसावी तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here