Kokan: बंद पडलेल्या भारती शिपयार्ड कंपनीतील अधिकारी, कर्मचारी ठेकेदारांची देणी तब्बल दहा वर्षानंतर ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली!

0
16
भारती शिपयार्ड कंपनीची देणी तब्बल दहा वर्षानंतर ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली!
बंद पडलेल्या भारती शिपयार्ड कंपनीतील अधिकारी, कर्मचारी ठेकेदारांची देणी तब्बल दहा वर्षानंतर ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /रत्नागिरी-

रत्नागिरी – मिर्‍या येथील बंद पडलेल्या भारती शिपयार्ड कंपनीतील अधिकारी, कर्मचारी यांना ना.उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे वेतनासह उर्वरित शिल्लक रक्कम मिळाली आहे. कंपनी बंद पडल्यापासून गेली १० वर्षे अडकलेली रक्कम अधिकारी, कर्मचार्‍यांना मिळाली आहे. तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांचे वाटप १९५ कर्मचार्‍यांना करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील मिर्‍या येथे अनेक वर्षे सुरू असलेली भारती शिपयार्ड कंपनी सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडली. त्यावेळी कंपनीत कायमस्वरूपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी, मॅनेजर यांची देय रक्कम कंपनी देण होती. त्यामुळे करोडो रुपयांची देणी कंपनीकडे अडकली होती. तर ठेकेदारांचीही कोट्यवधींची बिले कंपनीकडे प्रलंबित होती. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

भारती शिपयार्ड कंपनी विरोधातील खटला एनसीएलटी न्यायालयाकडे सुरू असताना न्यायालयाने भारती शिपयार्ड टेकओव्हर करण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती केली होती. त्यानंतर कर्मचार्‍यांनी संबंधित कंपनीकडे प्रलंबित देण्याची विनंती केली होती. परंतु कंपनीने कर्मचार्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आमदार उदय सामंत यांच्याकडेही पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ.सामंत यांनी देखील कर्मचार्‍यांसाठी पाठपुरावा सुरु केला होता. कर्मचार्‍यांच्या सुदैवाने राज्याच्या उद्योगमंत्र्यांची धुरा ना.उदय सामंत यांच्याकडे आल्यानंतर ना.सामंत यांनी स्वतःहून कर्मचार्‍यांचा हा विषय हाती घेतला. भारती शिपयार्डचा ताबा योमेन मरीन कंपनीकडे आल्यावर ना.सामंत यांनी उद्योगमंत्री म्हणून योमेन मरीन कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक धनंजय मिश्रा यांच्याशी चर्चा केली. मिर्‍यासह रत्नागिरीतील १९५ कर्मचार्‍यांचे २ कोटी ५० लाख रुपये भारती शिपयार्ड कंपनीचे देणे होती. त्यावर चर्चा करून तडजोडीअंती कर्मचार्‍यांना प्रत्येकाच्या वेतनानुसार एकूण १ कोटी ७५ रुपये देण्याचे धनंजय मिश्रा यांनी मान्य केले. त्यानुसार चार टप्प्यात कर्मचार्‍यांना त्यांची देणी तब्बल दहा वर्षानंतर ना.उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळेच मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here