Kokan: बांदा ग्रामस्थांची मठपर्वत पदयात्रा उत्साहात 

0
59
पदयात्रा
बांदा ग्रामस्थांची मठपर्वत पदयात्रा उत्साहात 

 सुनिता भाईप / ( सावंतवाडी )
बांदा ग्रामस्थ मंडळींची श्री रामभटस्वामी समाधी मंदिर ,मठपर्वत- सटमठ येथे पदयात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.बांद्यातील पदयात्रींनी दुपारी श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करुन पदयात्रेस आरंभ केला.मार्गातील देवस्थानांचे दर्शन घेत पदयात्रींनी प्रथम डोंगराच्या पायथ्यापाशी असलेल्या श्री रामभटस्वामींच्या मंदिरात दर्शन घेऊन नामस्मरण केले.त्यानंतर डोंगर चढण्यास आरंभ केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-सुरंगीच्या-फुलांना-प्रत/

शिखरावर पोहोचताच श्री रामभटस्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच स्वामींनी स्थापन केलेल्या श्री गणपती व श्री हनुमंताच्या  कोरीव मुर्त्यांना वंदन केले.त्यानंतर नामस्मरण व आरती करण्यात आली.समाधीला वंदन करुन पदयात्री  परतले. बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचा हा वार्षिक उपक्रम आहे. दरवर्षी बांदा ते माणगांव पदयात्रेने या उपक्रमाचा आरंभ होतो व मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथील पदयात्रेने त्याची सांगता होते. येत्या मंगळवारी दि.19 मार्च रोजी श्री म्हातारेबाबा पदयात्रा होणार असल्याचे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी यावेळी जाहीर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here