पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार – माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर_
बांदा ता.१७-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे प्रशासकीय बदली झाल्याने येथे रिक्त झालेल्या पदी अद्यापपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात न आल्याने येथील आरोग्य सेवेवर याचा परिणाम झाला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणचे-दुःख-कोणी-दूर-करेल/
बांदा हे महामार्गावरील महत्वाचे शहर असल्याने व या ठिकाणी टेलिमेडिसिन केंद्र असल्याने तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या तथा रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी सांगितले आहे.

