सुनिता भाईप/ सावंतवाडी
बांदा रोटरी क्लबने गेली दोन वर्षे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. याची दखल टरोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रोटरीच्या नियमानुसार नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. आगामी एका वर्षासाठी रो सीताराम गावडे यांची बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी निवड झाली आहे. नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वामी समर्थ सभागृहात माजी जिल्हा गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट रो प्रमोद कामत यांनी रोटरी क्लबच्या सभे मध्ये दिली.
सचिवपदी रो शिवानंद भिडे व खजिनदारपदी रो स्वप्नील धामापूरकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नूतन प्रेसिडेंट रो सीताराम गावडे, मावळते प्रेसिडेंट रो प्रमोद कामत, संस्थापक प्रेसिडेंट रो मंदार कल्याणकर, रो सुदन केसरकर, रो योगेश परुळेकर, रो रत्नाकर आगलावे, रो हनुमंत शिरोडकर, रो सुधीर शिरसाट, रो आपा चिंदरकर, रो सचिन मुळीक, रो फिरोज खान तसेच अन्य रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-खासदार-नारायण-राणे-यांनी/
सीताराम गावडे म्हणाले, रोटरी क्लब ऑफ बांदाने लक्षवेधी कामगिरी केली. दोन वर्षात ७० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक स्तरावर काम करण्यात आले. . विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकल वाटप, युवतींना सॅनिटरी पॅड, वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मदत, वृक्षारोपण, मराठी शाळेना स्मार्ट टिव्ही या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. भविष्यातही रोटरीचे काम अधिक जोमाने करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.