Kokan: बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ

0
26
श्री विठ्ठल मंदिर,
बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ

सुनिता भाईप/ सावंतवाडी-
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला.सप्ताहाचे पारप्रमुख,सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा,समई व तबला,पेटी,टाऴ आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आले. ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी वीणा व सर्व साहित्याचे पुजन केले.त्यानंतर ठिक 12 वाजता पहिला पार आळवाडाचे पारप्रमुख विनित पडते यांचेकडे वीणा देण्यात आला व नामाच्या गजरात प्रदक्षिणा करुन सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी भजन व आरती करुन प्रसाद वाटण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-पाट-तेली-वाडीतील-रामचंद्/

  या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ रोजी सप्ताहाची सांगता होणार असून बुधवार दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे.  सप्ताहाचे पार पुढील प्रमाणे आहेत. मंगळवार दि. ९ जुलै आळवाडा विनीत पडते, बुधवार दि. १० रोजी गांधीचौक सुदन केसरकर, गुुरुवार दि. ११ रोजी निमजगा गवळीटेंब संदेश पावसकर, शुक्रवार दि.१२ जुलै रोजी देऊळवाडी श्रीप्रसाद वाळके, शनिवार दि. १३ जुलै रोजी हॉस्पिटल कट्टा उमेश काणेकर, भाई शिरसाट, रविवार दि. १४ रोजी मारुतीगल्ली दत्तप्रसाद पावसकर, सोमवार दि.१५ जुलै रोजी  उभाबाजार निलेश महाजन  सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व  रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here