Kokan: बांद्यात फॅक्टरी आउटलेट काजुगर दुकान अज्ञात चोरट्यानी फोडले

0
28
काजुगर,
बांद्यात फॅक्टरी आउटलेट काजुगर दुकान अज्ञात चोरट्यानी फोडले

काजुगरसह ३ ते ४ हजार रुपयांची रोकड चोरट्याने केली लंपास

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

बांदा : बांदा शहरातील ककाजुगर व ३ ते ४ हजार रुपयांची रोकड चोरट्याने ट्टा कॉर्नर बाजारपेठेतील चिन्मय नाडकर्णी यांच्या मालकीचे फॅक्टरी आउटलेट काजुगर दुकान अज्ञात चोरट्याने फोडून आतील काजुगर व रोख रक्कम लंपास केली. भर बाजारपेठेत व आजूबाजूला दुकानाची दाटीवटी असूनही नाडकर्णी यांचे दुकान फोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सोशल-मिडीया-फ्रंट-कोकण-वि/

बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. श्री नाडकर्णी हे मनसेचे बांदा शहरप्रमुख आहेत. त्यांनी अलीकडेच याठिकाणी काजुगर आउटलेट सुरु केले होते. रात्रीच्या वेळी दुकानाचे लॉक कटावणीच्या साहाय्याने तोडून शटर उचकटून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. आतील काजुगर व ३ ते ४ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here