मुबंई- महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली.https://sindhudurgsamachar.in/kokan-गोवा-बनावटीच्या-अवैध-दार/
सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची आरामको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. रत्नागिरी प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदीर अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.
काय आहे बारसू प्रकल्प?
कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर आता बारसूतील सोलगाव परिसरात ती ‘क्रूड ऑइल रिफायनिंग’ कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील ‘आरामको’ या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे 13 हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे.
मात्र ग्रामस्थ आपल्या जागा या प्रकल्पासाठी देण्यास तयार नाहीत. आमचा आंबा, मत्स्य व्यवसाय, शेती हे सगळंच या प्रकल्पामुळे नष्ट होईल, हा प्रकल्प प्रदूषण करणारा आहे. त्यामुळे कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पानं बाधा पोहोचेल. त्यामुळे कोकणतील पारंपरिक व्यवसाय, बागा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करत येथील ग्रामस्थांनी या नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, कोकणातील राजापूर सोलगाव इथं प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रादकारणाचं रण पेटलेलं आहे. स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध असल्याचं चित्र आहे. रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिकांची जोरदार निदर्शने सुरू तिथं असून या प्रकल्पामुळे त्यांच्या उपजिविकेवर थेट परिणाम होईल, अशी रहिवाशांची धारणा आहे.