रत्नागिरी – कोकणाच्या निसर्गावर घाला घालण्याचा डाव होता. हा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला असला तरीही अजूनही रिफायनरीचा धसका आणि चीड कोकणातील ग्रामस्थांच्या मनात आहे. बारसू येथील आंदोलने, उपमोर्चा या मार्गाने कमी अधिक विरोध होत होता. मात्र आता मात्र विरोध करण्यासाठी एका प्रकारचा अवलंब केला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिरगांव-हायस्कूल-व-कनिष्/
ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमके त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.
येथे जी दडपशाही चालली आहे त्यामध्ये आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा आमचा ठाम निश्चय सरकारला दाखवायचा आहे.